Samana । मुंबई : शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
त्यानंतर आज पहिला अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आलंय. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांना बळ मिळो! अश्या शीर्षकाखाली आजचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. याआधी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामानाच्या आजच्या अग्रलेखात ?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो! , असं ते अग्रलेखात म्हंटले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान 20 ते 22 तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे.
शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. शिंदे व त्यांच्या चाळिसेक आमदारांनी शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला, पण ‘आमचीच शिवसेना खरी’ असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला. उद्या शिंदे व त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील व जिवाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील. ‘‘तुम्ही कसले शिंदे? तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच!’’ असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत व त्यांची मानसिक अवस्था पाहता असे दावे ते करू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटास फार टोकदार प्रश्न विचारला आहे की, ‘‘तुम्ही बंडखोर नाही तर नेमके कोण आहात?’’ न्यायालयाने त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, ‘‘पक्षाचा नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करू शकता का?’’ या दोन्ही प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. मुख्यमंत्रीपदाची लालसा व ईडी वगैरेंच्या कारवाया यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शिंदे व त्यांच्या टोळीने विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असे नाही. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे, असंही म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray । तीन पक्ष बदलणाऱ्या केसरकरांवर कसा विश्वास ठेवणार; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
- Ajit pawar | “… तर मुख्यमंत्री आजारी पडलेच नसते”; अजित पवारांचा शिंदेंना टोला
- Balasaheb Thorat । ED सरकारमध्ये आंदोलनाचाही अधिकार नाही का?; बाळासाहेब थोरातांचा गंभीर सवाल
- Nana Patole । दडपशाहीने आंदोलन चिघळण्याचा भाजप प्रयत्न करतंय; नाना पटोलेंचा आरोप
- Pravin Draekar | भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<