Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आक्रमक झाल्याचं महाराष्ट्राने पहिले. पण आज जवळपास सरकार स्थापन होऊन २६ दिवस झाल्यानंतर काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. त्याचा पहिला भाग काल प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. तर यानंतर आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला.
या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो. आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, याआधी काल पहिल्या भागात मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही, पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती, तेव्हा काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला- नारायण राणे
- Jayant Patil | “…म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे अचानक नावडते झाले”; जयंत पाटलांची बंडखोरांवर टीका
- Narayan Rane : “आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का?, कुणाला काहीही गद्दार म्हणता”; नारायण राणेंची सडकून टीका
- Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार
- Shahjibapu Patil : उद्धव ठाकरे आजारी होते तर एकनाथ शिंदेंना चार्ज द्यायचा होता – शहाजीबापू पाटील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<