जर श्रेय घ्यायचंच असेल, तर राम मंदिर उभारुन दाखवा-उद्धव ठाकरें

मुंबई : शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई चालूच असल्याच चित्र दिसतेय. “भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल, तर राम मंदिर उभारुन दाखवावं.”, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला लगावला.

“भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल, तर राम मंदिर उभारुन दाखवावं. एखाद्या स्टेशनला नाव देऊन श्रेय घेऊ नका.” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. मुंबईतल्या अंधेरीत  संगीतकार अनिल मोहिले मैदानाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

काल पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई मोठ्या प्रमाणात दिसते आहे.