मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सरकारच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( शिवसेना ) शिवसेनेचे आठ मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी शिवसेनेने सर्व आमदारांना आज सायंकाळी बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. त्यामध्ये बंडखोर आमदारांना असेही निर्देश देण्यात आले आहेत की, तुम्ही या बैठकीला उपस्थित न राहिल्यास तुम्हाला पक्ष तोडायचा आहे, असे मानले जाईल आणि तुमचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. दरम्यान दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्याबाबद ट्विट करत मोठे विधान केले आहे.
दिपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या, “माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल.”
माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे.
आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल. @ShivSena— Deepali Sayed (@deepalisayed) June 22, 2022
संजय राऊत यांचं ट्विट –
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे ठाकरे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –