मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करू नका ; उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची युतीच्या आमदारांना तंबी

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेनेचे नेते वेग वेगळी वक्तव्य करत असल्याने चुकीचा संदेश जातो त्यामुळे यापुढे कुणीही मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करू नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या आमदारांना दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री पदावरून युतीत विविध चर्चा सुरु आहेत. तसेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात हजेरी लावली. विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या आमदारांची बैठक घेतली.

त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचं सध्या चांगलं सुरू असलं तरी मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळे सूत्र निघतात. भाजप आणि शिवसेनेचे नेते वेग वेगळी वक्तव्य करत असल्याने चुकीचा संदेश जातो त्यामुळे यापुढे कुणीही मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करू नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीच्या आमदारांना दिली.

इतकेच नव्हे तर, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात सर्व गोष्टी ठरल्या आहेत. त्याची काळजी तुम्ही करू नका असेही त्यांनी म्हंटले. तसेच विरोधक ताकद कमी झाली असली तरी गाफील राहू नका असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, जागावाटप कसं करायचं याचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार आहोत, असेही त्यांनी म्हंटले.Loading…
Loading...