उद्धव ठाकरे आणि अहमद पटेलांची गुप्त बैठक, महाशिवआघाडीबाबत झाली निर्णायक चर्चा

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्ष प्रमुक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मंगळवारी रात्री उशिरा मुंबई येथील ट्रायडंट हॉटेल मध्ये बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांनी आपले फॉर्म्युले समोर ठेऊन चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते काल मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले होते. यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकमत झाल्याशिवाय पाठींब्याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे म्हंटले होते. सत्तेत कशा पद्धतीने तिन्ही पक्षांची भागीदारी असेल या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.

त्यानंतर अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी फॉर्म्युल्यांवर चर्चा झाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याने बहुमत सिद्ध करण्यासाठी महाशिवआघाडीची लगबग सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीचे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. मात्र सत्तेचे वाटप कसे होणार यावर चर्चा करण्यासाठी आणि एकमत होण्यासाठी वेळ लागत असल्याने सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या