fbpx

पाटील-तावडेंचं निमंत्रण स्वीकारलं

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यात भाजप मंत्र्यांना यश आलं आहे. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच’ असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे.

सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे मातोश्रीवर गेले होते. आपला योग्य तो सन्मान राखला गेला, तर सोहळ्याला उपस्थिती लावू, असे संकेत ठाकरेंनी दिल्यानंतर भाजप मंत्री निमंत्रण देण्यासाठी उद्धव यांच्या घरी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपूजन कार्यक्रमात असतीलच, शिवाय त्यांचा सर्व प्रकारचा सन्मान राखला जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

2 Comments

Click here to post a comment