मुख्यमंत्र्यांनी आधी CAA समजून घ्यावा; काँग्रेसचा सल्ला

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शुक्रवारी प्रथमच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

सीएएवरून कोणाला घाबरण्याची गरज नाही. एनआरसी फक्त आसाम पुरते मर्यादित असून संपूर्ण देशात लागू होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सीएएला समर्थन दिल्याचे समजते. याशिवाय, राज्यातील जीएसटी, शेतकऱ्यांच्या मुद्दयांवरही चर्चा झाल्याचे सांगितले.

Loading...

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएबाबत सकारात्मक संकेत दिल्यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री मनिष तिवारी यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा,’ असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला.

दरम्यान, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती कायदा -2003 ची माहिती घेणे आवश्यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसंच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवं, कारण धर्म हा नागरिकत्वचा आधार असू शकत नाही”, असं मनिष तिवारी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात