मुंबई : मुख्यमंत्रीपदी मी नको असेल तर तसे मला स्पष्ट सांगा, येऊन सांगा किंवा फोनवर सांगा” असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आण राष्ट्रवादीने मला विरोध केला असता तर वाईट वाटले नसते, पण माझ्याच लोकांनी मला विरोध केला आहे, याचा धक्का बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अट घातली, त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्याशी येऊन का बोलला का, नाहीत? असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला संही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –