fbpx

उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे : सुबोध भावे

टीम महाराष्ट्र देशा – पुण्यात नुकताच राहुल गांधी यांनी तरुणाईशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोधने केले होते. त्यावरून सोशल मिडीयावर सुबोध चांगलाच ट्रोल झाला.चौफेर टीका होऊ लागल्यानंतर आता सुबोधने स्पष्टीकरण दिले आहे. मी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना माझ्या कामाचा एक भाग म्हणून भेटलो. त्यांची मुलाखत घेण्याचे काम मी कलावंत म्हणून स्वीकारले होते. त्यातून अन्य कुठलाही अर्थ काढला जाऊ नये, असे स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे याने दिले आहे.

पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी राहुल गांधींवर बायोपिक करणार असल्याचे जाहीर केले होते. भावे एवढ्यावरच थांबले नाहीत तर राहुल गांधींना बालपणी आजी व वडिलांच्या मृत्यूची घटना पाहावी लागली. एवढ्या लहान वयात दोन मोठे आघात त्यांनी पचवून एक मोठं नेतृत्व म्हणून उभे राहिले. या सगळ्यासाठी वाघाचं काळीज लागतं, असे म्हणत स्तुतिसुमने देखील उधळली होती.

नेमकं काय म्हणणे आहे सुबोधचे ?

मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो व त्याचा अभिमान आहे. माझ्या सहकाऱ्यांचा व उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे व प्रेम आहे. आजपर्यंत मी मोहन भागवत, शरद पवार, देवेंद्र फडणवीस ,राज ठाकरे, रामदास आठवले या सर्वांना अतिशय प्रेमाने भेटलो. राहुल गांधी यांनाही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्याच आदर व प्रेमांनी भेटलो. मी रंगभूमीचा कलाकार आहे.रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांत भेदाभेद शिकवत नाहीत.