मोदी सरकारने देशात राजांना देखील भिक मागायला लावली : उदयनराजे भोसले

udayan-raje

टीम महाराष्ट्र देशा : सातार लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी एका प्रचारसभेत बोलताना मोदी सरकारला लक्ष केले. ‘या सरकारने राजांना देखील भिक मागायला लावली आहे’. अशी टीका त्यांनी यावेळी केली. उदयनराजे सातारा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी उदयनराजेंनी राज्यातील फडणवीस सरकारवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, तुम्ही निधी दिला परंतू मी त्याचा पाठपुरावा केला म्हणून तुम्ही कामं केली. तसेच या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं. गरिबांचं उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा हिरावून घेतलं. तसेच निवडणुका लागल्या की यांच्याकडे भरभरुन पैसे असतात. आमच्या गाड्या चेक केल्या तर शिळ्या भाकरी मिळतील. परंतू तुम्हाला ज्या गाडीवर कमळ दिसेल त्या गाडीत मी तुम्हाला पैसे शोधुन देतो असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Loading...

तसेच राजेंनी  विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांना देखील शाब्दिक फटकारे मारले. ‘लोकांसमोर जाताना आती ही लोकं लटलट कापतायत. भाषण करताना डायसचा आधार नसेल तर ते खाली पडतील’, अशा शब्दात उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांना टोले मारले.

दरम्यान सतार लोकसभामध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरले आहेत. गेल्या दोन पंचवार्षिकला उदयनराजे भोसले यांनी सातार लोकसभा मतदार संघातून सहज बाजी मारली आहे. त्यामुळे या वेळेस देखील उदयनराजे सहज बाजी मारणार का याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला