पवारांच्या मध्यस्थीने दोन्ही राजेंमध्ये दिलजमाई, एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये सातारा मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्यात पवार यांना यश आल्याचं कळतय. तसेच खुद्द पवार यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही राजेंमध्ये दिलजमाई झाली असून एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत केला गेला असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे दोन्ही राजेंमधील वादात पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.