fbpx

उदयनराजेंना लोक वैतागले, पराभव होणार ; काकडेंची नवी भविष्यवाणी

पुणे : निवडणूक काळात भविष्यवाणी केल्याने वारंवार चर्चेत राहणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी चक्क साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासंदर्भात भविष्यवाणी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काकडे यांनी हा दावा केला आहे.

उदयनराजेंना स्थानिक लोक कंटाळले आहेत. जिल्हा परिषदेला त्यांनी 40 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी केवळ 3 जागा आल्या, त्यामुळे साताऱ्याची जागा यावेळी नक्कीच आम्ही जिंकणार.उदयनराजे हे सुद्धा एक ते दीड लाखाने पराभूत होतील. कारण उदयनराजेंना लोक वैतागले आहेत”असं काकडे म्हणाले.

दरम्यान,पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला निश्चितपणे हादरा बसेल अशी परिस्थिती सध्या आहे, असे सांगत काकडे यांनी बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.