उदयनराजे वरिष्ठ नेते ते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत कशाला फिरतील- अजित पवार

udayanraje and ajit pawar

कऱ्हाड: राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल यात्रा काढत संपूर्ण राज्य पिंजून काढले मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्याच सभेत दिसले नाहीत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गिनती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील, असा खुलासा अजित पवारांनी केला. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून दरम्यान, अजितदादा पत्रकारांसोबत बोलत होते.

उदयनराजे भोसले यांनी काहीदिवसांपूर्वी भाजप नेत्यांसोबत बंददाराआड चर्चा झाल्याचे वृत्त होते. उदयनराजेंनी साताऱ्यातील हल्लाबोल सभेला जाने टाळले. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. तसेच शिवेंद्रसिंहराजेंनी मी साताऱ्याचा मालक आहे, असे एकट्या कोणी समजू नये, असे नाव न घेता उदयनराजेंवरच हल्ला चढवला. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलतांना दिसत आहेत.

Loading...

काय म्हणाले अजित पवार

उदयनराजे भोसले हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील. खरंतर उदयनराजेंची काम करण्याची पद्धत आमच्यापेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ते साहेबांसोबत असतात.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'