fbpx

खासदार उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा ! शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार

udyanraje vr shivendraraje

सातारा: खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे खलनायक असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी खलनायक आहे, ठीक आहे; पण तुम्ही बिनदाढीचे प्रेम चोप्रा आहात. मी सारखं अमोल पालेकरच्या भूमिकेत राहणार नाही, असाही टोला शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला.

काल साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या टीकेला आज शिवेंद्रसिंहराजेंनी पलटवार केला आहे. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ उदयनराजेंच्या गाडीमध्ये मटकेवाले आणि खंडणीखोर फिरत असतात. हे कोणाला दिसत नाही. अशे कणखर टीकास्त्र शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर सोडले.