‘मी केंद्राचं बघतो, तुमच्यात धाडस असेल तर राज्यात अधिवेशन घेऊन दाखवा’; उदयनराजेंच ‘चॅलेंज’

udayanraje

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं.

या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंचा पारा चांगलाच तापलेला पाहायला मिळाला. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते करत आहेत. उदयनराजेंनी देखील मराठा आरक्षणासाठी राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात राजकारण्यांनी, सरकारने समाजासाठी काय केलं हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची इच्छा नाही फक्त राजकारण सुरु आहे. संभाजीराजे आणि माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण, असं देखील उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. तसेच, ‘आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्या लोकांना आडवा आणि गाढा’ अशा शब्दांत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, परिस्थितीनुसार कायदा दुरुस्ती झाली पाहिजे. राज्यात विशेष अधिवेशन बोलवा. तुम्ही काय दिवे लावले हे लोकांना कळू द्या. दम असलं तर बोलून दाखवा. मात्र सध्या उगाच टोलवा टोलवी सुरु आहे. मी केंद्राचं बघतो आधी यांच्यात धाडस असेल तर राज्यात अधिवेशन घेऊन दाखवावं,’ असं थेट आव्हान उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP