Udayanraje Bhosale | रायगड : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले आहे. आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विकृतांच्या वक्तव्यावर पांघरुन घालणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे, असा निशाणा उदयनराजे भोसले यांनी भाजपवर साधला आहे.
“राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. या विकृतीमुळे सगळ्यांनी ग्राह्य धरले काही होत नाही. हा बोलला तो बोलला. ही संपूर्ण राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी राज्यपालांच्या वक्तव्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करतात. यांना लाज वाटली पाहीजे,” असा निशाणा उदयनराजे यांनी राज्य सरकारवर साधला.
उदयनराजे म्हणाले, “राज्यपालांची उचलबांगडी जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. इथं असते तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिले असते. त्यांचा तोल गेला असता. त्यांना मी हात लावला नसता, त्यांना हात लावून माझा कमीपणा झाला असता.”
“भारत महासत्ता होणे गरजेचे आहे. शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. विकृत लोकांच्या हातात देशा गेला आहे. हे असंच राहील तर आधी देशाचे तीन तुकडे झाले. आता ३३ तुकडे व्हायला वेळा लागणार नाही, शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे,” असे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, “राज्यपालांना पदावरुन हटवावे, अशी मागणी कायम असणार आहे. यासाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च पद असते, तसे राज्यपाल राज्याचे सर्वोच्च पद आहे. त्या पदावरती त्यांना राहण्याचा अधिकार नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale | …तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं – उदयनराजे भोसले
- Udayanraje Bhosale | राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे आक्रमक! म्हणाले, “लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी…”
- Mercedes SUV Launch | मर्सिडीजची नवीन एसयुव्ही लाँच, करेल ‘या’ कारसोबत स्पर्धा
- Sanjay Raut | …तर तुमच्या शिव्यांचं महाराष्ट्र कौतुक करेल, पण… ; संजय राऊतांचे गायकवाडांना चॅलेंज
- Lip Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या ओठांची काळजी