उदयनराजे आपले प्रतिस्पर्धी नरेंद्र पाटील यांच्या आईला भेटायला थेट हॉस्पिटलमध्ये

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपले प्रतिस्पर्धी आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या आईची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यामुळे उदयनराजेंचा राजकारानापलीकडचा चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे.

शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची आई वत्सलाताई या आजारी असल्याने, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचा सुरु आहेत. वत्सलाताईंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट हॉस्पिटल गाठले. नरेंद्र पाटलांच्या आईच्या प्रकृतीची चौकशी केलीच, सोबत डॉक्टरांकडूनही उपचारासंदर्भात सर्व माहिती घेतली.

यासंदर्भात उदयनराजे यांनी ट्विटरवर म्हटलंय की, “महायुतीचे उमेदवार श्री नरेंद्र पाटील व आमचे मित्र जि.प.सदस्य श्री रमेश पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई यांची हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली व डॉक्टरांकडून आजाराची सर्व माहिती घेतली.”

Loading...