अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची उदयनराजेंनी घेतली गळाभेट

पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे समजताच समर्थकांची मोठी गर्दी

वेबटीम : एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी खासदार उदयनराजे यांचे अटकपूर्व जामिन अर्ज सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने फेटाळले होते. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र उदयनराजे शहरात दाखल झाल्याने पोलीस ठाण्यात हजर राहतील अशी अटकळ बांधण्यात येत होती.

अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. अगदी पाचच मिनिटं पोलिस स्टेशनमध्ये थांबून उदयनराजे बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा ते पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. खासदार उदयनराजे पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे समजताच समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

bagdure

दरम्यान ज्या पोलिस अधिकाऱ्यावर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक करण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच उदयनराजेंची गळाभेट घेतल्याचा प्रकार घडला आहे.

 काय आहे प्रकरण ?
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं.

 

You might also like
Comments
Loading...