फसवा फसवी कराल तर आम्हाला पण कळतं, उदयनराजेंचा शरद पवार यांना थेट इशारा

टीम महाराष्ट्र देशा- मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आता थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच थेट इशारा दिला आहे. फसवा फसवी कराल तर आम्हाला पण कळतं असा इशाराच खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची उदयनराजेंनी विश्रामगृहवर भेट घेतली. त्यांनतर या भेटीबद्दल उदयनराजेंनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.शरद पवार हे फार मोठे नेते आहेत. आजही या वयात ते एवढे फिरत आहेत. मी आज त्यांना कडकडून भेटलो. मला ते म्हणाले, तुम्ही आमचेच आहात नंतर बोलू. पण मला एवढेच सांगायचे आहे .फसवा फसवी कराल तर आम्हाला पण कळतं असं ते म्हणाले.

उदयनराजेंच्या वाढदिवसाला शरद पवार जाणार; मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बहिष्कारच

वडीलानंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल; गोपीनाथ गडावर छत्रपती उदयनराजे गहिवरले

You might also like
Comments
Loading...