आता एका – एकाची पुंगी वाजवतो; उदयनराजेंचा राष्ट्रवादीला इशारा

udayan-raje-1

कराड – आपल्या वेगळया स्टाईलसाठी कायमच चर्चेत असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला सज्जड इशारा दिला आहे. हिंमत असेल तर मैदानात उतरा अपक्ष उमेदवार म्हणून एका एकाची पुंगी वाजवतो असं उदयनराजे यांनी म्हंटल आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपली कॅालर उडवत राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला. लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या… अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला. माझे पोट राजकारणावर चालत नसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भल्या – भल्यांची कॅालर आपल्यापुढे खाली होते. असं म्हणत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान या टीकेला उत्तर देताना शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॅालरची केलेली स्टाइल मला आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले असंही यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आत्ताच सांगू शकत नाही. पण चर्चा झाली एवढे नक्की अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.