Share

Udayanraje bhosale | ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न’; यावर उदयनराजे म्हणतात…

Udayanraje bhosale | सातारा :  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच तयार करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी एक आनंदाची बातमी देखील दिली.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) म्हणाले की, जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नक्की काय म्हणालेत उदयनराजे भोसले? (Udayanraje Bhosale)

“संपूर्ण जगभरात प्रत्येकाच्या भावना शिवरायांच्या ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ तलवारीशी जुळल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की ती भारतात यावी. ती सध्या इंग्लंडमध्ये जिथे ठेवली आहे, तिथे प्रचंड सुरक्षा आहे. मी स्वत: ते सर्व बघितलं आहे.” ती तलवार आता मोठ्या मनाने ब्रिटीश सरकारने परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी यावेळी उदयनराजे भोसले यांनी केली.

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (Pratapgad fort) येथील अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.  यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई काल पहाटेपासून सुरु केली. यावर देखील उदयनराजे बोलले.

ते म्हणाले, “शिवाजी महाराजांचा आयुष्यभराचा प्रवास जर आपण बघितला, तर त्यांनी नेहमीच प्रत्येकाचा मान सन्मान केला. त्यांच्यावर हल्ला करायला आलेल्या माणसाला तिथे जागा दिली. त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. मात्र, इतका मोठा विचार आपण कोणीच करू शकलो नसतो. पण त्यांनी केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधली. आज त्याला एवढे वर्ष लोटून गेले. ती खरं तर आता मोकळी केली पाहिजे. तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवला पाहिजे. असं उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Udayanraje bhosale | सातारा :  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले. या सांस्कृतिक धोरणाचा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Satara

Join WhatsApp

Join Now