fbpx

‘राजेशाही असती तर दुष्काळ निवारणाचे सर्व निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो’

टीम महाराष्ट्र देशा- आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचे सर्व निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो, असे वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्याचे सत्ताधारी दुष्काळाबाबतचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील भोसले यांनी केला.

तत्पूर्वी, भोसले यांनी आज भल्या पहाटे तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे, यावेळी उदयनराजे यांनी राज्यातील दुष्काळ दूर करण्याचे साकडे देवीला घातले आहे. पहाटेची वेळ असताना देखील त्यांच्या समर्थकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती. यावेळी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मनोमन प्रार्थना केल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.