जेव्हा उदयनराजे पवारांच्या गाडीचं सारथ्य करतात

Udayanraje-Bhosale_Sharad-Pawar-580x395

सातारा: नेहमी आपल्या हटके आणि बिनधास्त स्टाईल मुळे चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं.एवढचं नव्हे तर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यासोबत सातारा ते पुणे एकत्र प्रवास केला.या प्रवासादरम्यान पवारांनी उदयनराजेंना कोणता कानमंत्र दिला आणि उदयनराजेंनी पवारांना काय सांगितलं हे जरी समोर आलं नसलं तरी राजकीय चर्चांना मात्र उधान आलं आहे .

शरद पवार आणि उदयनराजे भोसले हे पुण्यात होते. बुधवारी पवार सातारा दौऱ्यावरआहेत . त्यानिमित्ताने पवार आणि उदयनराजे यांची फोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर चर्चा करतच साताऱ्याला जाऊ, असं उदयनराजे पवारांना म्हणाले.मग पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलावलं. त्यानंतर उदयनराजेंनी जो पवित्रा घेतला, तो पवारांनाही धक्का देणारा ठरला. कारण उदयनराजे थेट ड्रायव्हिंग करु लागले.सध्या साताऱ्यात उदयनराजे समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये वाद  सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उदयनराजेंची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.