उदयनराजे भोसले-देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला; राज्यसभेबाबत चर्चा ?

blank

टीम महाराष्ट्र देशा – राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांबद्दलच्या महत्वाच्या निवडीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार उदयनराजे भोसले हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले असल्याची खात्रीलायक बातमी सूत्रांनी दिली आहे.

तसेच या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडीक हेही या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. सदर बैठकअमित शाहांच्या दिल्लीतील घरी बैठक सुरू असून या बैठकीत महाराष्ट्रातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.

तसेच येत्या काळात होणाऱ्या राज्यसभा तसेच विधान परिषद निवडीमध्ये कोणाला संधी देण्यात येणार आहे याबद्दलच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडून राज्यसभेचे तीन खासदार निवडून जाऊ शकतात.

यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल असून तिसर्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.