दिल्ली : भाजप खासदार उदयनराजे भाेसले हे सध्या दिल्लीत आहेत. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. मात्र यावेळी जेव्हा त्यांना पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मात्र त्यांनी राऊतांविषयी बोलायला नकार दिला. मात्र त्याचवेळी “संजय राऊत हे देव आहेत”, असा टोलाही उदयनराजे यांनी लगावला.
पुढे बोलताना उदयनराजे हे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाची बाजू घेत म्हणाले, “जनतेची अपेक्षा असते की, त्यांची कामं झाली पाहिजेत. मात्र जर कामच होत नसतील तर जनतेसमोर कसं जायचं? त्यांना काय उत्तर द्यायची? मग जर काम होतच नसतील तर बाजूला झालेलंच बरं”. त्याचबरोबर संजय राऊतांबद्दल विचारले असता “त्यांच्याबद्दल बाेलून मला माझं ताेंड खराब करायचं नाही”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भाेसले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- Aurangabad and Osmanabad rename controversy | गुगल मॅपकडून औरंगाबादचा संभाजीनगर तर उस्मानाबादचा धारा शिव उल्लेख
- Lok Sabha : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- BJP MLA Shweta Mahale : आमदारांच्या आर्थिक फसवणूकीसंदर्भात श्वेता महाले यांच स्पष्टीकरण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<