आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्या – उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा : आषाढी निमित्त सबंध पंढरपूर विठ्ठलनामाच्या जयघोषात नाहून निघाल आहे. मात्र यंदा वैष्णवांच्या मेळ्याला मोर्चाच संकट आहे.गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.

सोलापुर जिल्ह्यात मराठ्यांनी रणशिंग फुंकले; पंढरीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महासंकट