उदयनराजे भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांची भेट ; अनेक विषयांवर चर्चा

उदयनराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिल्लीत भेट झाली आहे. दिल्ली विमानतळावर दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे.

दिल्लीमध्ये ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. दिल्लीकरांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे. ६ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान थेट ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात ‘जाणता राजा’चे प्रयोग होतील.