fbpx

सातारचा फैसला आज,शरद पवार घेणार मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते खासदार उदयनराजे यांना जाहीरपणे विरोध करत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत केला गेला असल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत.

सातारा मतदारसंघात गटबाजीला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीत कलह एवढा वाढला आहे की दस्तुरखुद्द शरद पवार हेच माढ्यातील आपल्या उमेदवारीचा पुनर्विचार करू करत असल्याची चर्चा आहे. हा वाद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीच्या पराभवाचे कारण देखील ठरू शकतो. माढा लोकसभा मतदारसंघामध्येही सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती आहे.