‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले

सातारा : ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा असे सुनावले आहे. ही धमकी नाही समज आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले. ते साताऱ्यात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?

दहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणा-यांनी नाचता येत नसताना नाचण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीला बघु काय हाय, काय नाय, कसं होत नाय, डॉल्बी तर वाजणारच. कोण बी येतंय, फॉरेनची पाटलीण ठरवतंय, तुमच्या आमच्या सारखी आवली लोकं? असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली. गणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच त्रास होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण काय?झाला तर सहन करायचा? कारणे द्यायची नाहीत. एवढंच वाटतंय तर जुन्या बिल्डींगा पाडा, डागडूजी करा, नाही तर गप्प बसून गणेशभक्तांचा एक दिवसाचा हट्ट पूर्ण करा. डॉल्बी तर वाजणारच ही धमकी नाही तर समज देतोय.

You might also like
Comments
Loading...