आलिशान कारमधून फिरणारे उदयनराजे जेव्हा डंपर चालवतात…

टीम महाराष्ट्र देशा– आपल्या वेगळया स्टाईलसाठी कायमच चर्चेत असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची एंट्री ही नेहमीच हटके आणि धमाकेदार असते. याचा प्रत्यय सातारकरांना पुन्हा एकदा आला. आज त्यांनी चक्क त्यांनी सातारा नगरपालिकेचा डंपर चालवला.

सातारा नगरपालिकेच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे पूजन आज सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी वर्ग व सातारकर नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पूजनांनंतर चक्क डंपरचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी पालिकेच्या वाहतूक विभागापासून राजवाडा चौपाटीपर्यंत डंपर चालवला. त्यांच्या या कृतीने सगळेच अवाक झाले.