उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा:आदरणीय उदयनराजे आज आपण पत्रकार परिषदेत सरळ शब्दात उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्या बद्दल आपलं अभिनंदन या आशयाचं ट्वीट करून घणाघाती टीका केली आहे ती माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी.जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून सध्या गदारोळ चालू आहे.याच वादावर साताऱ्याचे माजी खासदार उदयन राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन सरळ – सरळ संजय राऊत आणि शिवसेनेला फैलावर घेतले.

बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार अशी नाव न घेतला शिवसेना खासदार संजय राउत यांच्यावर देखील उदयनराजेंनी जोरदार घणाघात केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आता याच मुद्द्याला धरून ट्वीटर च्या माध्यमातून संजय राऊत आणि शिवसेनेला राणेंनी टीकेच लक्ष केलं आहे