…तर उद्रेक व्हायला फार काळ लागणार नाही, रायगडावर उदयनराजे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर पार पडत आहे. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवरायांना मुजरा केला. यावेळी शिवस्मारक, ईव्हीएम घोटाळा, यारख्या अनेक मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांचा आक्रमक आवतार पाहायला मिळाला.

जनतेने आता लक्षात घेतल तर ठीक आहे नाहीतर काही खर नाही. या लोकांना तुम्हाला फक्त भीती घालून द्यायची आहे. सरकार म्हणतंं माझ्या ताब्यात आरबीआय, सीबीआय, निवडणूक आयोग आहे. अस म्हणत उदयनराजेंनी सरकारवर चांगलेचे ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, या सगळ्या संस्थेतील लोकांनी लक्षात घेतल पाहिजे आपण लोकांच्या हिताचे करत आहोत की नाही. नाहीतर १८५७ मध्ये जसा बंड झाला तसा उद्रेक व्हायला फार काळ लागणार नाही आणि तो जर झाला तर त्याला कोणीही थांबवू शकणार नाही . असा थेट हल्लाच उदयनराजेंनी रायगडावरून सरकारवर चढवला आहे.