fbpx

साताऱ्यातून उमेदवारी उदयनराजे यांनाच; पवारांचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्यातून लोकसभेला राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसले यांना मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना एका गाडीत घातल्याने आता मनोमिलनाचा पहिला गियर पडलेला आहे, लवकरच या गाडीचा टाप गियर देखील पडेल, अशा शब्दात साताऱ्याची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांना मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत.

साडेचार वर्षांत साडेचार लाख कोटीचे कर्ज या राज्यावर केले आहे आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ते पाच लाख कोटीपर्यंत जाईल. एवढा कर्जाचा डोंगर या भाजपावाल्यांनी उभा केला आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. राज्याला कर्जबाजारीपणातून बाहेर काढायचं तर परिवर्तन केलंच पाहिजे, असही यावेळी पवार म्हणले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘जीएसटी’मुळे व्यापारी मेटाकुटीला आलेले आहेत. साखरेचे दर ३,४०० रुपये करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पण सरकारला त्याचं देणं-घेणं नाही. ओठात राम आणि पोटात नथुराम अशा विचारांची माणसं देशाचं आणि राज्याचं नेतृत्व करत आहेत.