पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत,उदयनराजेंचा सूचक इशारा

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले .पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे यांनी सांगितले. परंतु, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी दिला.

निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर शरद पवार उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देणार का, उमेदवारी न दिल्यास उदयनराजे दुसऱ्या पक्षात जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उदयनराजे की श्रीनिवास पाटील,साताऱ्याचा उमेदवार आज पवार ठरणार

You might also like
Comments
Loading...