fbpx

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या : उदयनराजे

udyan raje bhosale1

टीम महाराष्ट्र देशा- राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. साताऱ्यात एका आंदोलनाच्या वेळी भोसले बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उदयनराजे ?

तुम्ही जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी जर तुमचे प्रश्न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग. आरोग्य विभागातील मशिनरी कर्मचारी नाहीत म्हणून सडून गेल्या आहेत ही वस्तुस्थिती असून, आज बलात्काराच्या घटना वाढत आहेत, याचं कारण तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. राजेशाही असती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या.