पक्षांतराच्या चर्चा वायफळ, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतचं कायम

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या राष्ट्रवादी नेते आणि सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी तातडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर यांची आज पुण्यात भेट घेतली होती. पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे, शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा पक्षांतरा बाबत असल्याचे सांगितले जात होते. त्यावर आता काही लक्षवेधी माहिती समोर आली आहे. उद्यान राजे भोसले हे भाजप आणि शिवसेनेत न जाता राष्ट्रवादीतच रहणार असल्याच बोलाल जात आहे.

या बैठकी नंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, आणि आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवरती चर्चा झाल्याचं सांगितलं. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून, जाण्याची चर्चा कुठे झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाही. मात्र भाजपच्या गोटातून माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे.

दरम्यान उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. यावेळी उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती होती. पण आज शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उदयनराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.