‘ही सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’- उदयनराजे

सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे कायम चर्चेत असतात ते आपल्या हटके स्टाईल आणि वक्तव्यामुळे यावेळेस सुद्धा राजेंनी असचं एक वक्तव्य केलंय पण यावेळेस ते राजकीय नसून भावनिक आहे. साताऱ्यातील एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं त्यावेळी उदयनराजे म्हणाले की, अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’ त्याचबरोबर राजेंनी आपल्या स्टाईल मध्ये डायलॉगबाजी सुद्धा केली

नक्की काय म्हणाले उदयनराजे

एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे. आय लव्ह यू ऑल…
मनापासून… रिअली… एवढच सांगतो अजून काय बोलू, आय लव्ह यू ऑल…