fbpx

‘काळजी करू नका मी आहे ना’ उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

टीम महाराष्ट्र देशा : कराडला आलेल्या महापुरामुळे येथील पाटण कॉलनीतील झोपडपट्टी वासियांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आम्हाला शासनाने पक्की घरे बांधून द्यावी व आमचे पाटण कॉलनीमध्येच पुनर्वसन करण्याची मागणी खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे केली. यावेळी पुनर्वसनाचा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नसून खासदार निधीतून पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांना मदत करण्याचा प्रयत्न करेन, त्यासाठी बाधितांनी आपल्या मागण्या सविस्तरपणे द्याव्यात. त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

पाटण कॉलनीतील पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कराड नगरपालिका मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून शासनाकडे रीतसर प्रस्ताव पाठवणे गरजेचा आहे. प्रस्ताव पाठवल्यावर आपण त्याबाबत पाठपुरावा करु. तसेच या बाधितांना माझ्या खासदार निधीतून मदत करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. अस उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान पाटण येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या येथील पूर परिस्थिती व पाटण कॉलनीतील पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांचे नगरपालिकेच्या शाळा क्र. 3 मध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी 9 रोजी खासदार उदयनराजे भोसले आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवेंद्रसिंहराजेंना थोपवण्यासाठी शरद पवारांनी आखलाय हा ‘बिग गेम’

उदयनराजेंना काय जबाबदारी द्यायची हे अजून ठरल नाही – शरद पवार

महादेव जानकरांनी दिली खा.उदयनराजे भोसले यांना ‘रासप’मध्ये येण्याची ऑफर