संभाजी भिडे गुरुजीवर बोलतांना उदयनराजे भावूक

भिडे गुरुजी विरोधात बोलण्याची लायकी नाही

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे गुरजी व मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर बोलतांना उदयनराजे भावूक झाले.

उदयनराजे भोसले म्हणाले, मला मनापासून दु:ख होत आहे. माझे संभाजी भिडे गुरुजी यांचाशी बोलणे झाले. त्यांची काही चुकी नाही. मी संभाजी भिडे गुरुजींना चांगल्याप्रकारे ओळखत असून त्यांच्याबद्दल कोणाची बोलण्याची लायकी नाही. भिडे गुरुजी वडीलधारी असून त्यांनी लहान मुलाच संघटन केल आहे. त्यांचा काहीही संबंध नाही. अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी केलं आहे.