fbpx

एक्झिट पोल गेले खड्ड्यात, आधी माझ्या शेतकऱ्यांना पाणी आणि चारा द्या- उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा : एक्झिट पोल गेले खड्ड्यात मला त्याच्याशी घेणे देणे नाही. कोण निवडून येईल हे उद्या कळेलच. आधी माझ्या शेतकऱ्यांना पाणी आणि चारा द्यायला प्राधान्य द्यावं. असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते 40 जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान, एक्झिट पोल वरून दाखवण्यात येणाऱ्या निकालाबाबत त्यांना विचारले असता, एक्झिट पोल गेले खड्ड्यात मला त्याच्याशी घेणे देणे नाही. कोण निवडून येईल हे उद्या कळेलच. एक्झिट पोल बाबत कोणालाही उत्सुकता राहिलेली नाही. शेतकऱ्यांना पाणी आणि चारा द्यायला प्राधान्य द्यावं. असे उदयनराजे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, जनावरांच्या चाऱ्याचा अनुदान दोनशे रुपये करावे, शेतकऱ्यांना शिवारात पाणी यावं याची उत्सुकता लागली आहे. पण सरकारला त्यासाठी वेळ मिळायला हवा. अशी टीकाही त्यांनी केली.