उदयनराजेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

udayanraje bhosale

बारामती: बारामतीच्या सीआर ग्रुप युवक संघटनेच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात बारामती पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी महार जातीचा वारंवार उल्लेख केल्याचा आरोप सीआर ग्रुप युवक संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच ते संख्येने किती आहे? असं म्हणून महार जातीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. महार या शब्दाचा उल्लेख करणं हा गुन्हा असून उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल होणे अत्यंत गरजेचे आहे.

उदयन राजे भोसले म्हणाले, मला मनापासून दुख होत आहे. माझे संभाजी भिडे गुरुजी यांचाशी बोलणे झाले. त्यांची काही चुकी नाही. मी संभाजी भिडे गुरुजींना चांगल्याप्रकारे ओळखत असून त्यांच्याबद्दल कोणाची बोलण्याची लायकी नाही. भिडे गुरुजी वडीलधारी असून त्यांनी लहान मुलाच संघटन केल आहे. संभाजी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांची  संख्या किती आहे. हे लक्षात घ्यायला हवे.

 

atracity