उदयनराजे आतून आमच्या बरोबरचं, रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

आठवले

टीम महाराष्ट्र देशा : सातारा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मशीन हटवा आणि बॅलेट पेपरवर पुन्हा माझ्या मतदारसंघात निवडणुका घ्या असे वक्तव्य केले होते. यावर रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार उदयनराजे जरी तुम्ही शरद पवारांबरोबर असला तरी आतून आमच्या बरोबरचं आहात त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देवून उगाच जनतेला त्रास देऊ नका, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.

आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा कमळ या चिन्हावर लढणार नसुन स्वतंत्र चिन्हावर लढणार आहे. आगामी निवडणुकीनंतर भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यावे आणि राहिलेले एक वर्ष आरपीआयला मुख्यमंत्री पद द्यावे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

Loading...

दरम्यान काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी फेसबुक पोस्ट देखील केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?