पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र यायचे असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले. उदय सामंत आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, “होय आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत. पण जे नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत ते शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी येत आहेत. रत्नागिरीतही 18 नगरसेवक मला भेटले आणि त्यांनीही शिंदेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. माझी आज पिंपरी चिंचवड येथील काही नागरिकांशी चर्चा देखील झाली आहे. पण याचा अर्थ शिवसेना फुटली असा होत नाही”. तसेच मंत्री मंडळ विस्ताराबद्दल विचारले असता, कुणाला कोणते पद द्यायचे हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे, असे देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना सामंत म्हणाले, “आमच्या या उठावात एकनाथ शिंदे एकदाही म्हणाले नाहीत कि, मला शिवसेना बळकवायची आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण मला ताब्यात घ्यायचा आहे किंवा मला पक्षप्रमुख व्हायचे आहे. त्यामुळे असा कोणताही गैरसमज करु नये. उध्दव साहेबांसाठी जो आदर काल आमच्या मनामध्ये होता तो आज ही आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे”.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली होती. “नकली धर्मवीराने स्वतःच्या स्वार्थासाठी लाचारी पत्करली आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला उभे केले, त्याच शिवसेनेला संपवण्याचे पाप बंडखोर आमदार करत आहेत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते बंडखोर आमदार यापुढे रस्त्यावर भीक मागत फिरतील, अशी टीका त्यांनी केली त्यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. तसेच विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण ती आपली संस्कृती नाही”, असे सामंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “उनकी मुस्कुराहट पर न जाना…”, संजय राऊतांनी पोस्ट केला ‘तो’ फोटो
- Sanjay Raut : राज्यपाल दरवाजे, खिडक्या बंद करून बसलेत, त्यांना काहीच दिसत नाही; संजय राऊत आक्रमक
- Imtiyaz Jaleel । संभाजीनगर नामांतराचा सर्वसामान्य नागरिकांनी विरोध करावा – इम्तियाज जलील
- Sambhaji Chhatrapati : “गडकोटांसाठी स्वंतत्र मंत्रालय स्थापन करा”, संभाजी छत्रपतींची शिंदे सरकारकडे मागणी
- Sambhaji Chhatrapati : “ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर…”, संभाजी छत्रपतींची खंत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<