उदय सामंत इतक्या वेळा तोंडावर आपटलाय की त्याचा केसाचा टोप निघेल – निलेश राणे

blank

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. या परीक्षा घेताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भातील एक पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना दिलं आहे. यामुळे ठाकरे सरकारने जरी परीक्षा रद्द केलेली असली तरीही विद्यापीठांना परीक्षा घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे.

यामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थी अधिक संभ्रमात गेले असून आता, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे चित्र या निर्णयाबाबत निर्माण झाले आहे. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत इतक्या वेळा तोंडावर आपटलाय की त्याचा केसाचा टोप निघेल. सुरुवातीपासून नियोजनबद्ध काम केलं असतं तर ही वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती. कोर्टाने बाजू घेतली नाही आणि विद्यापीठांनी पण नाही. विद्यार्थ्यांना/पालकांना मनस्ताप दिल्याबद्दल याने माफी मागावी’, अशा शब्दांत ट्विट करत उदय सामंत यांच्यावर विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भातील भूमिकेवर टीका केली आहे.

दरम्यान, एका बाजूला राजस्थान, ओरिसा,पंजाब, हरियाणा, तामिळनाडू व पश्चिम बंगाल हे राज्ये महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे अनुकरण करत असताना, केंद्राने महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीचा विचार केला नसल्याचे उदय सामंत यांचे मत आहे.

मंत्री उदय सामंत यांनी, महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती मांडत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व मानसिक स्थिती बघता विद्यार्थ्यांना योग्य सूत्रांच्या आधारे त्यांना पास करून डिग्री देण्यात यावी अशी विनंती देखील केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये ते म्हणतात, ‘UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंधार्बत दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वानाच धक्का आहे.महाराष्ट्रातील कोवीडची परिस्थिती माहित असताना हा निर्यय म्हणजे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे..मी परत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे’.

दरम्यान, विद्यार्थी मात्र चांगलेच कात्रीत सापडले असून भविष्याबाबत अंधार असल्याने पालक देखील चिंता व्यक्त करत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये एकसुतत्रिपणा नसल्याचा त्रास मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून राज्यातील विरोधी पक्षाने देखील सरकारच्या निर्णयाशी सहमत होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी भावना सोशल मीडिया द्वारे व्यक्त केली जात आहे.

‘जे एका भावाला नाही जमल ते अजितदादांनी शब्दासाठी करून दाखवले…’

भाजपाच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही- थोरात

कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा 28 दिवसांसाठी जेलबाहेर