Share

Uday Samant | “काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो…”, उदय सामंत यांचा सूचक इशारा

Uday Samant | मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), भाजप(BJP) पक्षाचे नेते नारायण राणे (Narayan Rane), नितेश राणे (Nitesh Rae) यांनी एकमेकांवर खूप खालच्या पातळीच्या टीका, टिपण्ण्या केल्या. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत 

उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो. राजकारणामध्ये टीका-टिप्पणी होत असते. परंतू टीका करताना आपण जी पातळी गाठतोय, ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल, अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती.” उदय सामंत यांनी आज सकाळी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून हे ट्विट (Tweet) केलं आहे. परंतू उदय सामंत यांचा निशाणा नक्की कोणत्या नेत्यावर होता, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही.

दरम्यान, नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रदेखील विचारत नाही. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस तू काय म्हशी भादरत होतास का?. नारायण राणे देशाचे मंत्री पण गल्लीत त्यांना कुणी विचारत नाही, उद्धव ठाकरे तर राणेंचं कधी नावही घेत नाही. पण ठाकरेंची सभा पार पडली रे पडली, की राणेंनी प्रेस घेतलीच म्हणून समजा, एवढी कोंडबीचोराची वाईट अवस्था झालीय, असं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली होती.

तसेच, काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?, असं म्हणत भास्कर जाधव यांनी नितेश राणेंना सुनावलं.

महत्वाच्या बातम्या :

Uday Samant | मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now