परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

uday_samant1

मुंबई: गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय वापरला जात आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आक्रमकपवित्रा घेत सद्याची परिस्थिती बघता अंतिम वर्ष परिक्षांविषयी थेट HRD व युजीसीला प्रश्न केले असून राज्यातील गंभीरता लक्षात आणून दिली आहे. आज उदय सामंत यांनी आता एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “राजभवनात कोरोना…अमिताभजींना कोरोना.. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला.. आता तरी HRD आणि युजीसी ला पटेल का..कि परीक्षा घेणं म्हणजे माझ्याया विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे..आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का???,” अशा आक्रमक शब्दांत आता त्यांनी सवाल केले आहेत.

 

तर, युजीसीने सप्टेंबर अखेर पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात असे गाईडलाईन्स मध्ये सांगितले असून कार्यपद्धती(SOP) देखील जाहीर केली होती. ‘कोरोनाने अनेकांचं नुकसान झालं आहे. अशात विद्यार्थ्यांचंही नुकसान झालंय कारण परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र सध्या अशा वातावरणात परीक्षा घेणं योग्य नाही. त्यामुळे यूजीसीने कोणताही गोंधळ न करता वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावं’ अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आमचा विद्यार्थी सहामाही पास झालायं, प्रॅक्टिकल अजून बाकी आहे – शरद पवार

युजीसीने जाहीर केलेली कार्यपद्धती

१)परीक्षार्थींना आरोग्याशी संबंधित एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. २)प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगन उपलब्ध असेल. ३)ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल. ४)परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा विशेष पालन करण्यात येईल. ५)त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य असेल. ६)परीक्षा केंद्रातील फरशी, दरवाजे, भिंती, फर्निचर, रेलिंग, जिना या सर्वांना निर्जंतुक केले जाईल. ७)सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवले जातील. ८)येण्याच्या आणि जाण्याच्या जागी गर्दी करता येणार नाही. ९)परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद केली जाईल, यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येईल.

अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही, राऊतांचा भाजपला टोला