उमेदवार निवडून आले कि मतदारांना गाळात घालतात- उदयनराजे भोसले

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज पुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्या खडकी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यात आले होते. यावेळी उदयनराजे यांनी, मी कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो नसून, एक मित्र म्हणून येथे आलो आहे असे स्पष्ट केले.

माणसाला कोणताही पक्ष घडवत नाही. लोकांची जो जाणीव ठेवेतो, तोच पक्ष मोठा होतो. तसेच मतदारांनी निवडणुकीच्या काळात आमिष दाखवल्यापेक्षा मदतीला धावून येणाऱ्याचा विचार करावा. निवडणुकीत उमेदवार मतदारांना आमिष दाखवतात, वेगवेगळी आश्वासने देतात. मात्र निवडून आले कि मतदारांचा गाळात घालतात. असे उदयनराजे म्हणाले. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, वैशाली पहिलवान, संगीता तिवारी, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...