उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र…!

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोस्ती पाहायला मिळाली. ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. मात्र ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेतल्याचं शिवेसेनेनं मुख्यमंत्र्यांना कळवलं. त्यामुळे ख्यमंत्र्यांनीही उद्घाटनाला येण्यास नकार दिला.

उद्धव ठाकरे सध्या कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर आहेत. ठाण्यातील विविध २५ प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रंगणार होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनाला येण्यास नकार दिला. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

यानिमित्ताने भाजप शिवसेना एकत्र आल्याचे दिसून आले. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून भाजप शिवसेनेनला गोंजारताना दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...