उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर

Udayraje Bhosale

सातारा : खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उदयनराजे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. उदयनराजे भोसले यांच्या अटकेनंतर सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कोर्टाने खासदार उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज सकाळी न्यायालयाने उदयनराजेंना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर उदयनराजे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केली. शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शहरातील ही व्यवस्था बिघडू नये म्हणून न्यायालयाने दुपारी दुसरी सुनावणी घेत उदयनराजेंना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.